Headlines

भाषा ही भावना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन: प्रा. खाड्ये

कासार्डे माध्म. विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा ⚡कणकवली ता.२३-: हिंदी ही भारतातील महत्वपूर्ण भाषांपैकी एक मानले जाते, राष्ट्रीय भाषेचा अभिमान बाळगत आपण सर्वांनी हिंदी भाषा आत्मसात करायला हवी,कारण भाषा ही आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन असते.म्हणुन हिंदी ही प्रत्येकाला बोलता यायलाच हवी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये यांनी…

Read More

न्हावेलीत उद्या आंबा किड व रोग नियत्रंणावर मार्गदर्शन

⚡बांदा ता.२३-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत न्हावेली – देऊळवाडी येथे शनिवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आंबा पुनर्जीवन, आंबा पीक किड व रोग नियत्रंण, भात पीक किड व रोग नियत्रंण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.यावेळी सहाय्यक प्राध्यापक आंबा विभाग, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, डॉ. एम.पी. कणसे हे मार्गदर्शन…

Read More

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीचा अहवाल सादर करा

सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांना आदेश;भाजपला १०० टक्के सावंतवाडीत यश मिळविण्यासाठी मंत्री चव्हाण यांची पूर्वतयारी ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषदवर भाजपचा झेंडा फडकविण्यासह १०० टक्के जिंकण्यासाठी गावोगावी जाऊन सध्यस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे जिल्हा प्रवक्ते…

Read More

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्त्वाचा

अमोल पाटील ;पोषण माह निमित्त फोंडा येथे कार्यक्रम ⚡कणकवली ता.२३-: सप्टेंबर महिना हा सध्या पोषण माह म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .एकात्मिक बाल विकास अधिकारी अमोल पाटील यांनी स्वागतपर भाषणात बाळासाठी सकस पोषण आहार किती महत्त्वाचा याबाबत अंगणवाडी सेविकांना आणि पालकांना माहिती दिली . बाळासाठी…

Read More

तालुकास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षा २०२२ चे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२३- : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास योग्य रितीने घराघरांत पोहोचावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तो वाचावा. या हेतूने मातृभूमी शिक्षण संस्थेने तालुकास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे. गेली चार वर्ष हा उपक्रम सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यांमध्ये राबवला जात आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सदर विषयावरील पुस्तकाचा अभ्यास करून,…

Read More

सेवा पंधरवडा अंतर्गत फोंडाघाट भाजपातर्फे पंतप्रधानाना पाठविली शुभेच्छा पत्रे

⚡कणकवली ता.२३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत फोंडाघाट भाजपा यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेली शुभेच्छा पत्रे पोस्टात टाकण्यात आली. यावेळी कणकवलीभाजपा तालुकाअध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा मिडिया प्रमुख समीर प्रभूगावकर,फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे,बबन हळदिवे,सुजाता हळदिवे,शक्ती केंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव,वैश्यसमाज चेअरमन दिलीप पारकर, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुखन बबलू सावंत,सर्वेश दळवी,ग्रा.पं.सदस्य विजय फोंडेकर,विलास लाड,पांडू…

Read More

सावंतवाडीत जुगार, मटक्याच्या सुळसुळाट

आशिष सुभेदार ; जेष्ठ नागरिक सतर्क: पोलिसांचा दुर्लक्षमनसे आक्रमक ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यात व शहरात गेले काही दिवस जुगार व मटक्याचे अड्डे राजवसपणे सुरू आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे अशा तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांकडून आमच्याकडे केल्या आहेत त्यामुळे या अड्ड्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे सोमवार दि. २६ रोजी मनसेचे…

Read More

दांडेली-पाडलोस-शेर्ले मार्ग वाहतुकीस धोकादायक

रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यांचे साम्राज्य ः लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ⚡बांदा ता.२३-: बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले भागातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडले. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत मार्ग निर्धोक करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या…

Read More

मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या…

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२३-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून भात शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे शेती कुजून नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी शासनाकडे सादर करावेत अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष…

Read More

राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी- प्रशांत नाईक

⚡बांदा ता.२३-: हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून कार्य करते. राजभाषा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्याइतपत समर्थ असून, हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे वक्तव्य मुंबई पोर्ट ट्रस्टचे लेखाधिकारी प्रशांत नाईक यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे केले.याठिकाणी आयोजित हिंदी दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने श्री. प्रशांत नाईक बोलत होते. यावेळी हिंदी…

Read More
You cannot copy content of this page