आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीचा अहवाल सादर करा

सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांना आदेश;भाजपला १०० टक्के सावंतवाडीत यश मिळविण्यासाठी मंत्री चव्हाण यांची पूर्वतयारी

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषदवर भाजपचा झेंडा फडकविण्यासह १०० टक्के जिंकण्यासाठी गावोगावी जाऊन सध्यस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना दिलेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थान रायगड इथं आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्यांना आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषद भाजपचा झेंडा फडकविण्यासह शतप्रतिशत भाजपासाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेत.

You cannot copy content of this page