⚡बांदा ता.२३-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत न्हावेली – देऊळवाडी येथे शनिवार २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आंबा पुनर्जीवन, आंबा पीक किड व रोग नियत्रंण, भात पीक किड व रोग नियत्रंण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी सहाय्यक प्राध्यापक आंबा विभाग, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, डॉ. एम.पी. कणसे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कविता सावंत यांनी केले आहे.
न्हावेलीत उद्या आंबा किड व रोग नियत्रंणावर मार्गदर्शन
