तालुकास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षा २०२२ चे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२३- : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास योग्य रितीने घराघरांत पोहोचावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तो वाचावा. या हेतूने मातृभूमी शिक्षण संस्थेने तालुकास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे.

गेली चार वर्ष हा उपक्रम सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यांमध्ये राबवला जात आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सदर विषयावरील पुस्तकाचा अभ्यास करून, शंभर गुणांची लेखी परीक्षा द्यायची आहे. ही परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येईल, परीक्षा दिनांक आधी कळविण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातून पहिले तीन क्रमांक, उत्तेजनार्थ दहा क्रमांक काढण्यात येणार आहेत. सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम, शिवस्वरुपातील भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. उत्तेजनार्थ क्रमांकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षिस वितरण सोहळा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होईल. परीक्षा फी रु. ५०/- आहे. तरी तालुक्यातील सर्व शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून सहकार्य करावे, असे आवाहन मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले यांनी केले आहे.
शिवचरित्रातून महाराजांच्या ठायी असलेले
नेतृत्वगुण, युद्धनीती, धाडस, न्यायबुदधी, अन्याया विरुद्ध लढा, कठीण परिस्थितीत मनोधैर्य टिकवणे अशा गुणांचा अभ्यास करून जीवनामध्ये ते गुण आत्मसात केल्यास प्रत्येकाला याचा निश्चितच फायदा होईल, असेही डॉ.लेले यांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. सोनल लेले – ९८२३५३७२९६, उर्मिला राणे – ७६६६८६७१४४, अस्मिता कोळी – ८६०५३३५२५९ यांच्याशी संपर्क करावा.

You cannot copy content of this page