आशिष सुभेदार ; जेष्ठ नागरिक सतर्क: पोलिसांचा दुर्लक्ष
मनसे आक्रमक
⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तालुक्यात व शहरात गेले काही दिवस जुगार व मटक्याचे अड्डे राजवसपणे सुरू आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे अशा तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांकडून आमच्याकडे केल्या आहेत त्यामुळे या अड्ड्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे सोमवार दि. २६ रोजी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर डी वाय एस पी रोहिणी सोळंके यांच्या भेट घेणार असल्याची माहिती सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली आहे.
याबाबत सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रक दिली असून त्यात असे नमूद करण्यात आले की सद्यस्थितीत शहरात अनेक ठिकाणी नाक्या नाक्यावर मटका बुकिंगची संख्या वाढली आहे राजरोसपणे त्या ठिकाणी जाऊन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी पैसे खर्च करताना दिसत आहेत.अंमली पदार्थ आणी दारूच्या आहारी गेल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवावा.
दोन दिवसांपूर्वी मळगाव येथे जुगार अड्डा सुरू अशी बातमी सोशल मीडियावर फीरत होती याकडे स्थानिक पोलिसांनी काय भूमिका घेतली याचे उत्तर द्यावे.
नवनिर्वाचित पोलीस अधिकारी फुलचंद मेंगडे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील काही दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना चाप बसला आहे ही कौतुकाची गोष्ट आहे यापुढेही त्यांनी असेच कारवाई सातत्य ठेवावे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मनसेचे नेते परशुराम उपरकर सोमवारी सावंतवाडीत येणार असून डी वाय एस पी ची भेट घेणार आहे त्यानंतर नियोजन करून ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल.
आशिष सुभेदार
शहराध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी
