Headlines

आगामी ग्रामपंचायत निवडणूक शिंदे गट-भाजप एकत्र लढणार

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी ग्रामपंचायत निवडणुक शिंदे गट व भाजप एकत्र लढणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.दरम्यान युतीमुळे कोणताही कार्यकर्ता दुखवल असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ असे तेली यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी महेश सारंग,अशोक दळवी ,बबन राणें,केतन आजगावकर,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते

Read More

अवकाळी पावसाची सावंतवाडीत आजही बरसात

भातशेती नुकसानीचा धोका वाढला ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस सध्या शहरात कोसळत आहे. दरम्यान कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली असून भात पिकाचे मात्र नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

Read More

सीमा वाद चाळविण्यास उपमुख्यमंत्र्यांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सूचना ?

महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा आरोप;सावंतवाडीत सर्व पक्षीय बैठक संपन्न सावंतवाडी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा आजचा प्रश्न नाही. मराठी माणसाचे शेकडो हुतात्मे यात गेलेत. गेल्या अनेक वर्षांचा हा लढा असून या लढ्यात आमच्या सारख्यांनी तुरुंगवास भोगला आहे. वेळोवेळी कर्नाटक आपली दादागिरी करून मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रात…

Read More

मळगाव येथील मायापूर्वचारी देवाचा जत्रोत्सव उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.२८सहदेव राऊळ-: मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या श्री देव मायापूर्वचारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव मानकऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री ढोलांच्या गजरात पालखी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी लोटांगणेही पार पडली. त्यानंतर मळगाव येथील दशावतार…

Read More

श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या

हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता २८मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची निर्गुण हत्या करणाऱ्या आफतापला तात्काळ फासावर द्या, तसेच अशा घटना रोखण्यासाठी लव जिहाद विरोधी कठोर कायदा करावा. अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. राज्यात “लव्ह जिहाद” ची समस्या गंभीर रुप धारण करत असून अनेक घटना उघडकीस…

Read More

सावंतवाडी येथील कवी संमेलनाला उत्स्पूर्थ प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२८-: साहित्यिक असो अथवा कवी असो जो समाजभान राखतो तोच समाजाभिमुख ठरतो. साहित्यात रंजकतेपेक्षा वास्तवकतेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. जो कवी वास्तववादी समाजाचे चित्रण रेखाटतो तोच समाजाचा आदर्श असतो असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार तथा लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्यावतीने संविधान दिनानिमित्त रविवारी सायंकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती…

Read More

महाजन, काणेकर, मुंगी घराण्याच्या खाजगी देवस्थानचा २९ पासून वार्षिक उत्सव

बांदाश्री देव रवळनाथ, भवानी, ब्राह्मण प्रमुख पंचायतन देवस्थान, बांदा महाजन, काणेकर, मुंगी या घराण्यांचे खाजगी देवस्थानाचा वार्षिक उत्सव 29,30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी होत आहे या निमित्ताने विविध धार्मिककार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 29 रोजी सायंकाळी ६.०० वाजता देवी भवानी मांडाची पुजा, रात्रौ ११.०० वा दिवटीचा कार्यक्रम व देवी भवानीचा अवसारी कौल, रात्रौ ११.३० महाप्रसाद,…

Read More

जलतरण तलाव अखेर सुरू

माजी नगरसेवकांच्या मागणीला मोठे यश;मात्र, शुल्क वाढविल्याने व्यक्त केली नाराजी ⚡सावंतवाडी ता.२८-: जलतरण तलाव सुरू करण्यात यावै यासाठी माजी नगरसेवकांनी प्रांताधिकारी व सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती दरम्यान सुरू न झाल्यास उपोषणाचा देखील इशारा दिला होता. अखेर आजपासून जलतरण तलाव सुरू झाल्याने माजी नगरसेवक यांच्या पाठपुराव्याला यश आले…

Read More

संतोष जोईल यांची कविता शोषितांच्या श्रमाला महत्त्व देणाऱ्या

अजय कांडर;”काहीच सहन होत नाही” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा उत्साहात     ⚡कणकवली ता.२८-:कविवर्य वसंत सावंत यांनी फोंडाघाटची भूमी सांस्कृतिक दृष्ट्या सुपीक केली आहे आणि आता नव्या पिढीतील कवी संतोष जोईल यांनी “काहीच सहन होत नाही” या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून फोंडाघाटच नाव साहित्य क्षेत्रात सर्व दूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कविता शोषितांच्या श्रमाला महत्त्व देणारी असून सामान्यातल्या सामान्य…

Read More

मळगाव येथील दुचाकी अपघातात एक गंभीर

⚡सावंतवाडी ता.२८-: दुचाकीने मळगाव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील एक युवक गंभीर जखमी झाला असून दोन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. ओमकार बाळा राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत (सर्व रा.मळगाव) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर त्यांना उपचारार्थ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरयातील गंभीर जखमी असलेल्या ओमकार…

Read More
You cannot copy content of this page