⚡दोडामार्ग ता.०२-: येथील निशा नारायण तर्पे यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर वारस वडील नारायण लाडू तर्पे यांना बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्ग यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
गुरुवारी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
निशा नारायण तर्पे यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग येथे खाते होते. त्यांनी बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना उतरवली होती. नैसर्गिक निधनानंतर शाखा व्यवस्थापक पवन कुलकर्णी व कर्मचारी शुभम गावडे यांनी विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे वारस नारायण लाडू तर्पे यांना २ लाख रुपयांचा धनादेश मिळाला.
याप्रसंगी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऋषिकेश गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नगरसेवक संतोष नानचे, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, फोंडू हडीकर, अमित गवस, शुभम गावडे, समीर राऊत, अक्षय कुमार, आकांक्षा रेड्डी, करनम नंदकिशोर, अरिहंत, नम्रता देसाई, वनश्री गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
