माजी नगरसेवकांच्या मागणीला मोठे यश;मात्र, शुल्क वाढविल्याने व्यक्त केली नाराजी
⚡सावंतवाडी ता.२८-: जलतरण तलाव सुरू करण्यात यावै यासाठी माजी नगरसेवकांनी प्रांताधिकारी व सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती दरम्यान सुरू न झाल्यास उपोषणाचा देखील इशारा दिला होता. अखेर आजपासून जलतरण तलाव सुरू झाल्याने माजी नगरसेवक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सर्व माजी नगरसेवकांनी जलतरण ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी प्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
दरम्यान जलतरण सुरू करण्यात आल्यावर शुल्कामध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे. २० रुपये वरून शंभर रुपये शुल्क करण्यात आले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष वेधणार असल्याचे सुरेश भोगटे यांनी सांगितले.
