महाजन, काणेकर, मुंगी घराण्याच्या खाजगी देवस्थानचा २९ पासून वार्षिक उत्सव


बांदा
श्री देव रवळनाथ, भवानी, ब्राह्मण प्रमुख पंचायतन देवस्थान, बांदा महाजन, काणेकर, मुंगी या घराण्यांचे खाजगी देवस्थानाचा वार्षिक उत्सव 29,30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी होत आहे या निमित्ताने विविध धार्मिक
कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 29 रोजी सायंकाळी ६.०० वाजता देवी भवानी मांडाची पुजा, रात्रौ ११.०० वा दिवटीचा कार्यक्रम व देवी भवानीचा अवसारी कौल, रात्रौ ११.३० महाप्रसाद, पहाटे ६.०० वा दीवटी विसर्जन, बुधवारी दि 30 रोजी रात्रौ ८.००वा पंचायतनाचा अवसारी कौल, गुरुवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा श्रींचे नामस्मरण, सकाळी १०.३० पासून संपूर्ण वर्षात श्री देवीस भरलेल्या ओटीच्या साड्या-खणांची,
श्री भवानीच्या मांडावरील कलशावरील श्रीफळ व कलशातील सोन्याच्या ५ ग्रॅम नाण्यांची पावणी, दुपारी 1.30वा श्री पंचायतनांस महाप्रसाद, आरती व पंचायतनाचा अवसारी कौल, सायंकाळी 6.30 वा
प्रसाद पाकळी कौल या वार्षिक उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page