आमदार निलेश राणे यांची संकल्पना
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आमदार निलेश राणे यांनी या ठिकाणी करावे असे आदेश दिल्यानंतर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी यासाठी प्रयत्न केले होते नगरपंचायतीच्या फंडातून हे डॉल्फिन फाउंटन उभारण्यात आले. या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, श्रीपाद तवटे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर, मंदार शिरसाट, गणेश भोगटे, संजय भोगटे आधी पदाधिकारी तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे निवेदन बादल चौधरी यांनी केले.
