⚡सावंतवाडी ता.२८-: दुचाकीने मळगाव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीवरील एक युवक गंभीर जखमी झाला असून दोन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. ओमकार बाळा राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत (सर्व रा.मळगाव) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर त्यांना उपचारार्थ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरयातील गंभीर जखमी असलेल्या ओमकार राऊळ याला गोवा बांबुळी येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले. हा अपघात रविवारी रात्री दहाच्या सुमारास मळगाव बाजारपेठ येथे घडला .
यातील ओमकार राऊळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गोवा बांबुळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर लवू राऊळ याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अक्षय भगत याची प्रकृती स्थिर असल्याने त्याला घरी पाठवण्यात आले आहे.
