⚡कणकवली ता.२८-:
रानमित्र आचरा तर्फे आयोजित पर्यावरण विषयक स्पर्धा केंद्रशाळा आचरा येथे संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी या गटामध्ये साप शत्रू नव्हे मित्र या विषयावरील वकृत्व स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण न.1 या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रेवती सुनील लाड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. याबद्दल रानमित्र परिवारातर्फे रोख 501 रुपये , प्रशस्तीपत्र आणि फणसाचे कलम रोप अशा स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
रेवतीचा सन्मान त्रिंबक गावचे डॉ.सकपाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प पक्षी अभ्यासक शिरपण गावकर, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी महाविद्यालयाचे पर्यावरण विषयक तज्ञ प्रा. डॉ. गणेश मर्गज, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, मुख्याध्यापक जोशी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन घाडी, डॉ.मगदूम, विशाल गोलतकर, स्वप्निल गोसावी, आणि रानमित्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर एक शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराम परब, शिक्षण प्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, सदस्य संजय उर्फ भाई परब, श्रावण केंद्राचे केंद्रप्रमुख देऊ जंगले, पोलीस पाटील धाकु दळवी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर मुद्राळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजय परब यांनी रेवतीचे अभिनंदन केले आहे. तसेच श्रावण गावातून रेवती सुनील लाड हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रेवतीला शाळेतील शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भिरवंडेकर यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेत रेवती सुनील लाड हीचे यश
