पोलीस घटनास्थळी दाखल
⚡सावंतवाडी ता.२८-: येथील माजगाव महादेव मंदिरातील अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून काही रोकड लंपास केली आहे. ही घटना आज सकाळी ग्रामस्थांना उघडकीस आली असून त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना कळवल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गेले काही दिवस सावंतवाडी सह जिल्ह्यात दानपेटी फोडण्याचा सत्र सुरूच आहे. घटनास्थळी पोलीस डुमीन डिसोजा, राऊत व गावचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
