कुडाळ तहसीलदारांचे अंत्योदय लाभार्थ्यांना आवाहन:कुडाळ तालुक्यातील ३३३७० लाभार्थी अद्याप बाकी..
कुडाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, शासनाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे Ekyc करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु कुडाळ तालुक्यातील एकूण १२१०५७ पैकी ८७६८७ लाभार्थ्यांनी Ekyc केलेली असून अद्यापही एकूण ३३३७० लाभार्थ्यांनी Ekyc केलेली नाही. तरी Ekyc न केलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन किंवा Mera eKYC अॅप वरून Ekyc पूर्ण करण्याचे आवाहन तहसिलदार कुडाळ सचिन पाटील यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी Ekyc केली नसल्यास त्यांचा धान्याचा लाभ बंद होणार आहे. तरी धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेतील नाव असणाऱ्या सर्व सदस्यांनी शिधापत्रिका व आधार कार्ड घेऊन जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन किंवा Mera eKYC अॅप वरून तात्काळ Ekyc करून घेण्यात यावी.
