⚡सावंतवाडी ता.२८सहदेव राऊळ-: मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या श्री देव मायापूर्वचारी देवाचा वार्षिक जत्रोत्सव मानकऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त मंदिरात अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवाला केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री ढोलांच्या गजरात पालखी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी लोटांगणेही पार पडली. त्यानंतर मळगाव येथील दशावतार नाट्यमंडळाचचा ‘म्हाळसाई महिमा’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर दहिकाला साजरा करण्यात आला. मळगाव व परिसरातील भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.
