पदाला न्याय देण्याचे काम करेन…

सौ. यज्ञा साळगावकर:पाट हायस्कूलमध्ये जि प सदस्या सौ यज्ञा साळगावकर यांचा सत्कार..

⚡कुडाळ ता.१२-: हा सन्मान स्वीकारताना प्रथम मी या शाळेचे विद्यार्थिनी असून येथील संस्कार आपल्या यशामध्ये उपयोगी पडले. यापुढे माझ्या पदाला न्याय देण्याचे कार्य मी करेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित जि प सदस्या सौ. यज्ञा देवदत्त साळगावकर यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलेल्या सौ यज्ञा देवदत्त साळगावकर या पाट हायस्कूलच्या सहशिक्षिका असून त्याचा सत्कार संस्था आणि विद्यालयातर्फे करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक श्री काळे सर यांनी शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकशाहीच्या मंदिरांचे पावित्र्य टिकविण्यासाठी असे सुशिक्षित उमेदवार जिल्हा परिषदेवर जाणे आवश्यक आहेत. त्यांच्या हातून उज्वल असे समाजकार्य घडू दे, अशा शुभेच्छा दिल्या. तर संस्थेच्या वतीने कार्यवाह विजय ठाकूर, संचालक राजेश सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था प्रतिनिधी बाबा तळवळेकर, सुधीर मळेकर, दीपक पाटकर आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप साळसकर यांनी केले,तर आभार पर्यवेक्षक बोंदर सर यांनी मानले.

You cannot copy content of this page