कोणताही राजकीय निर्णय घेताना लोकनिर्णय घेऊनच वाटचाल…

रुपेश पावसकर:नेरुर चव्हाटा येथे नवनिर्वाचित जि प आणि प स सदस्यांचा सत्कार..

⚡कुडाळ ता.१२-: नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघातुन सर्व मतदारांनी मला स्थानिक उमेदवार म्हणून प्राधान्य दिले. त्या मुळे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना सर्व प्रथम माझ्या लोकांचा निर्णय घेऊनच माझी राजकिय वाटचाल असेल, असे प्रतिपादन नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केले
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य  रुपेश पावसकर पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे व सौ दीप्ती नाईक यांचा सत्कार नेरूर ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिर नेरुर चव्हाटा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री पावसकर म्हणाले, मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा असताना मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, बौद्ध महासभा तसेच वंचित, आघाडी व महाविकास आघाडीच्यावतीने फार मोठे सहकार्य लाभले मला नेरुर पंचक्रोशीतील लोकांनी पाठिंबा दिल्यानेच माझा धनाढ्य शक्ती समोर टीकाव लागला असे सांगितले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितले कि नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांनी इतिहास घडवला आहे. तसाच इतिहास विकासकामातून निवडुन आलेल्या उमेदवारांनी करून दाखवावा असे आवाहन केले
माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपण निवडणुक स्पर्धेमध्ये नव्हतो . परंतु माजी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षांत आपला कुठेही शब्द पडु दिला नाही. तसेच वेळोवेळी ताकद दिली. म्हणूनच आपली पत्नी सौ अर्चना बंगे हिला निवडणूक रिंगणात उतरवले, असे सांगून भविष्यात श्री नाईक यांचा शब्द कुठेही पडू देणार नाही याची ग्वाही दिली.
यावेळी रुपेश पावसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर दोन्ही पंचायत समिती सदस्या यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लाड यांनी केले.

You cannot copy content of this page