Headlines

भटवाडी येथील “तो” मातीचा ढिगारा हटविला

सामाजिक बांधिलकी टीमने जोपासली सामाजिक बांधिलकी ⚡सावंतवाडी ता.०५-: येथील भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिर समोरील रस्त्याच्या मधोमध असलेला दगड मातीचा उंच ढिगारा अखेर सामाजिक बांधिलकीचे माध्यमातून पुढाकार घेऊन ‘तो’ सपाटीकरण करण्यात आला आहे. गेले कित्येक दिवस त्या मातीच्या उंच ढिगार्‍यामुळे अपघातास निमंत्रण मिळत होते. ही बाब सामाजिक बांधिलकीच्या लक्षात आल्याने त्यांनी पुढाकार घेऊन तो पूर्णतः सपाटीकरण केला…

Read More

आंगणेवाडी भराडी देवीचा ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जत्रोत्सव

मालवण ता.०५-:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी यात्रोत्सवाला सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा व इतर राज्यातून भाविक उपस्थिती…

Read More

कोल्हापूर हद्दीत झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी येथील ट्रक चालक ठार

आयशर केंटर ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात घडला होता अपघात ⚡सावंतवाडी ता.०४-: कोल्हापूर हद्दीत आयशर केंटर ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर आढळून झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडी येथील मोहम्मद याकुब शेख हा ट्रॅक चालक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

Read More

असिफ ख्वाजा यांनी व्ही. बी. नाईक यांना पुष्पगुच्छ देत दिल्या शुभेच्छा

७५ व्या अमृत महोत्सवनिमित्त दिल्या शुभेच्छा सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचे माजी शिक्षक अहमद ख्वाजा सर यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव असिफ अहमद ख्वाजा, यांनी व्ही. बी. नाईक यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवनिमित्त त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतला.

Read More

शिवसेनेला संपविणाऱ्याच्याच आहारी उद्धव ठाकरे गेले!

मंत्री दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला : उद्धव ठाकरे फक्त स्क्रीनवर दिसायचे ⚡सावंतवाडी ता.०४-: बाळासाहेबांची इच्छा होती की मुख्यमंत्री म्हणून माझा शिवसैनिक बसला पाहिजे. मात्र गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकाला कधी न्याय मिळाला का, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते परंतु रिमोट अजित पवार याच्या जवळ होता. ज्यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला त्याच्याच आहारी उद्धव…

Read More

शिवसेनेचे साळेल ग्रामपंचायत सरपंच म्हणून श्री. रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध निवड

⚡मालवण ता.०४-: मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे गावागावात जोरदार पडघम वाजत असतानाच साळेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावचे सरपंच म्हणून श्री. रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेने या ग्रामपंचायतीवर दावा सांगितला आहे यावेळी श्री. रविंद्र सहदेव साळकर यांचे शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सचिव तथा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव…

Read More

“अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना जाहीर”

⚡मालवण ता.०४-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण शाखेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार माडखोल सावंतवाडी शाळेचे शिक्षक आणि केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र नारायण वालावलकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा जि. प. केंद्रशाळा, माडखोल सभागृह येथे संपन्न…

Read More

यशप्राप्ती साठी ध्येय वेडे व्हा ! सत्यवान रेडकर यांचे विध्यार्थ्यांना आवाहन

मसुरे येथील शासकीय स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.०४-:प्रशासकीय स्वराज्य निर्माण होताना कोकण आणि सिंधुदुर्गचा डंका दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख आपल्या गावाची बनणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी वेगळ्या क्लासची गरज नसून स्वअध्ययन करून सुद्धा यश मिळवता येते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून ध्येय प्राप्तीसाठी अतोनत मेहनत करावी. यश प्राप्तीतून…

Read More

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे विद्यालयाच्या कुस्तीपटूंचे वर्चस्व

कणकवली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर ⚡कणकवली ता.०४-: क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा परिषद सिंधुदुर्ग तसेच कणकवली तालुका क्रीडा परिषद समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ‘कुडतरकर’ नाट्यगृहांमध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 27 गटांचे विजेतेपद कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुस्तीगीरांनी…

Read More

आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली

शिंदे गट प्रवक्ते मंत्री केसरकर यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.०४-: शिवसेना फुटण्यामागे अदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याच गंभीर आरोप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला कौल दिला होता परंतु जनमताचा अनादर करीत शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस बरोबर यांनी आघाडी केली महाराष्ट्रातील जनतेशी ही गद्दारीच…

Read More
You cannot copy content of this page