सामाजिक बांधिलकी टीमने जोपासली सामाजिक बांधिलकी
⚡सावंतवाडी ता.०५-: येथील भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिर समोरील रस्त्याच्या मधोमध असलेला दगड मातीचा उंच ढिगारा अखेर सामाजिक बांधिलकीचे माध्यमातून पुढाकार घेऊन ‘तो’ सपाटीकरण करण्यात आला आहे.
गेले कित्येक दिवस त्या मातीच्या उंच ढिगार्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत होते. ही बाब सामाजिक बांधिलकीच्या लक्षात आल्याने त्यांनी पुढाकार घेऊन तो पूर्णतः सपाटीकरण केला त्यामुळे भटवाडी येथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीच्या टीमचे आभार मानले.
यावेळी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शाम हळदणकर, रवी जाधव आदींनी यात सहभाग घेतला होता.
