आंगणेवाडी भराडी देवीचा ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जत्रोत्सव

मालवण ता.०५-:
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी यात्रोत्सवाला सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा व इतर राज्यातून भाविक उपस्थिती दर्शवितात या यात्रोत्सवाची कोणतीही तिथी नसते आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. लाखो भाविकाना केंद्रबिंदु मानुन कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page