बाळासाहेबांच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अशोक दळवी यांची नियुक्ती

⚡सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, पक्षाचे राष्ट्रीय पक्ष प्रवक्ते, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर पक्षाचे पक्ष सचिव श्री संजय मोरे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अशोक दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.

महीला जिल्हा संघटक पदी अँड निता सावंत कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीमध्ये नियुक्ती करण्यात आली असून सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी श्री. नारायण ऊर्फ बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी श्री गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ला तालुकाप्रमुख पदी श्री नितिन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा कार्यकारीणीत उपजिल्हाप्रमुख म्हणून श्री. सुनिल मोरजकर, वेंगुर्ला, जिल्हा संघटक पदी श्री सुनिल डुबळे, वेंगुर्ला, उपजिल्हा संघटक पदी श्री सचिन देसाई, वेंगुर्ला, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, दोडामार्ग, उपजिल्हा प्रमुख पदी श्री तुकाराम बर्डे, दोडामार्ग, उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र नि बाळकर, दोडामार्ग, उपजिल्हा संघटक पदी श्री दयानंद धाऊसकर दोडामार्ग, तालुका संघटक पदी श्री गोपाळ गवस दोडामार्ग, तालुका संघटक पदी श्री राघोजी सावंत, सावंतवाडी, शहरप्रमुख पदी श्री खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर सावंतवाडी, शहरप्रमुख पदी श्री. सचिन वालावलकर, वेंगुर्ला, शहरप्रमुख पदी श्री. लघु मिरकर, दोडामार्ग, उपशहरप्रमुख श्री सुजित कोरगांवकर, सावंतवाडी, उपशहरप्रमुख पदी डॉ. रावजी परब, वेंगुर्ला, श्री. उमेश येरम वेंगुर्ला, महिला तालुका संघटक पदी सौ. वैष्णवी केसरकर, सावंतवाडी, महिला तालुका संघटक पदी सौ. संजना सावंत, सावंतवाडी, महिला शहर संघटक पदी सौ. भारती मोरे, महिला तालुका संघटक पदी सौ. प्रतिक्षा पाटकर, वेंगुर्ला, महिला तालुका संघटक सौ. सानवी गवस, दोडामार्ग याची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिका- यांचे श्री. दिपक केसरकर, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य तुसेच मा. श्री. माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पुष्पगुच्छ देवून सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन केले.
जिल्हा प्रमुख नियुक्ती नंतर श्री अशोक दळवी यांनी आपले विचार मांडताना व्यक्ती पेक्षा पक्षाला पदाचा मान महत्वाचा आहे. तो शिरस्थानी मानून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कसा बहुमान मिळेल याचीही दक्षता घेतली जाईल. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत जावून शेतकरी, शेतमजूर, गरीब दुबळया व्यक्तीपर्यंत शासनाच्या मुलभुत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने व त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून पदाचा उपयोग करुन योग्य न्याय दिला जाईल. हे सर्व काम करीत असताना सर्व पदाधिका-यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना व लोकाभिमुख काम करण्यासाठी आम्ही कटीबदघ रहाणार आहोत, असे सांगितले. “गांव तिथे बाळासाहेबांची शिवसेना” सर्वागिण विकासासाठी संकल्प करुन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page