बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा यांची मागणी;अपर जिल्हाधिकारी डॉ जयकृष्ण फड यांना दिले निवेदन

⚡सावंतवाडी ता.०५-: केंद्र सरकारने सध्या बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा चालू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या विभागाचे राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा यांनी अपर जिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे.दरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थीच्या हितासाठी व न्यायासाठी निवेदन देण्यात आल्याचे ख्वाजा यांनी सांगितले.

यावेळी शफीक खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे नेते श्री.आबिद कित्तूर,श्री.कैस शाह,श्री.ताजुद्दीन रेडकर,श्री.जुबेर बागवान,श्री.गौस मुल्ला, श्री.मोहम्मद हनिफ काझी, श्री.इरफान मुल्ला, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page