मंत्री दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांना टोला : उद्धव ठाकरे फक्त स्क्रीनवर दिसायचे
⚡सावंतवाडी ता.०४-: बाळासाहेबांची इच्छा होती की मुख्यमंत्री म्हणून माझा शिवसैनिक बसला पाहिजे. मात्र गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकाला कधी न्याय मिळाला का, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते परंतु रिमोट अजित पवार याच्या जवळ होता. ज्यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला त्याच्याच आहारी उद्धव ठाकरे गेले असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान मंत्री केसरकर म्हणाले की कार्यकर्त्यांना गरज होती तेव्हा उद्धव ठाकरे भेटायचे नाहीत. ते फक्त स्क्रीनवरच दिसायचे असेही केसरकर म्हणाले.
