शिवसेनेचे साळेल ग्रामपंचायत सरपंच म्हणून श्री. रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध निवड

⚡मालवण ता.०४-: मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे गावागावात जोरदार पडघम वाजत असतानाच साळेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये साळेल गावचे सरपंच म्हणून श्री. रविंद्र सहदेव साळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेने या ग्रामपंचायतीवर दावा सांगितला आहे

यावेळी श्री. रविंद्र सहदेव साळकर यांचे शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सचिव तथा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, संग्राम प्रभुगावकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, जान्हवी सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page