“अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना जाहीर”

⚡मालवण ता.०४-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण शाखेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार माडखोल सावंतवाडी शाळेचे शिक्षक आणि केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र नारायण वालावलकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा जि. प. केंद्रशाळा, माडखोल सभागृह येथे संपन्न होणार आहे

या कार्यक्रमास जि प सिंधुदुर्गचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र विष्णू आंगणे हे अध्यक्ष म्हणून तर सावन्तवाडीचे गटशिक्षणाधिकारी
श्रीम. कल्पना राजाराम बोडके साहित्यिक विठ्ठल कदम, शाळा व्यवस्थापन समिती माडखोल नं.१ चे अध्यक्ष विजय तुकाराम राऊळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती सेवामयी शिक्षक पुरस्कार निवड समिती , कथामाला मालवणचे अध्यक्ष सदानंद मनोहर कांबळी यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केली.

प्रतीवर्षी शिक्षण क्षेत्रात साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन बालक, पालक आणि समाज यांच्यासाठी तन, मन, धन अर्पण करून सेवा केलेल्या शिक्षकास हा पुरस्कार प्रदान केला जातो. श्री. वालावलकर यांनी गेली ३३ वर्षे पेंडूर मुगचीवाडी, पेंडूर नं.१ (मालवण), सुरंगपाणी (वेंगुर्ले) चौकुळ, माडखोल (सावंतवाडी) आदी शाळेत शिक्षक व केंद्रप्रमुख म्हणून कार्य केले. प्रत्येक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून समाज शाळेत कसा येईल आणि शाळा समाजात कशी जाईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रत्येक शाळेत आणि गावा गावात शाळा तेथे कथामाला’हा उपक्रम राबविला आहे . वालावलकर यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page