शिंदे गट प्रवक्ते मंत्री केसरकर यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.०४-: शिवसेना फुटण्यामागे अदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याच गंभीर आरोप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.
दरम्यान महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला कौल दिला होता परंतु जनमताचा अनादर करीत शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस बरोबर यांनी आघाडी केली महाराष्ट्रातील जनतेशी ही गद्दारीच आहे असे केसरकर म्हणाले.
आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी भाषा जपून वापरावी केवळ ठाकरे घराण्याची आपुलकीचे संबंध असल्यामुळे आम्ही गप्प होतो मात्र आता आम्ही गप्प बसणार नाही संयमाचा अंत झाला आहे जशास तसे उत्तर देऊ असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
