Headlines

बांदा शहरात युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या…

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील गवळीटेम्ब येथील शिवराम दत्ताराम चव्हाण (वय २४) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु…

Read More

मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.११-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था संचलित मालवणी बझार मालवणतर्फे आयोजित मिरची महोत्सवाचा आज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रताप सहदेव बागवे, संचालक मंडळ सदस्य, सभासद, कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या मिरची महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या मिरची महोत्सवात उच्च प्रतीची बॅडगी मिरची, काश्मिरी मिरची, गुंटुर मिरची अशा विविध…

Read More

पर्यटकांना सौजण्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्या

पालकमंत्री चव्हाण यांच्या पोलीस दलाला सूचना ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल. अशी अपेक्षा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक…

Read More

मोती तलावातील गाळ काढून मिळावा…

संजू परब यांची पालकमंत्र्याकडे मागणी; तातडीने लक्ष घाला पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना.. ⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील मोती तलावातील गाळ काढून मिळावा आशी मागणी आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. दरम्यान मंत्री चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना सूचना करत संदर्भात तातडीने लक्ष घाला असे सांगितले.

Read More

मठ सातेरी, परिवार देवतांच्या पाषाणाचे आगमन

⚡वेंगुर्ला ता.११-: मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठान २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार असून त्यासाठीची नविन पाषाणे भाविकांच्या अमाप उत्साहात रविवार दि. ९ एप्रिल रोजी मठ-कुडाळ तिठा ते मठ सातेरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूकीने वाजत गाजत आणण्यात आली.

Read More

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे बांधणार स्वखर्चातून गणेशकोंड….

भुमीपुजनाने कामांची सुरवात; ग्रामस्थांमधून समाधान.. ⚡सावंतवाडी ता.११-: वेत्ये खांबलवाडी येथे सरपंच गुणाजी गावडे त्यांच्या हस्ते गणेश कोंड कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सरपंच श्री गावडे यांनी स्वखर्चातून हे काम हाती घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थातूनही समाधान व्यक्त होत आहे. वेत्ये खांबलवाडी याठिकाणी गणपती विसर्जनाची असलेली समस्या लक्षात घेत सरपंच श्री गावडे यांनी तेथील ग्रामस्थांना हा प्रश्न सोडवण्याचा…

Read More

गाबीत महोत्सवात ‘सागरी सुंदरी’ स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.११-: अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवात दि. २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सागरी सुंदरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गाबीत समाजातील १८ ते ३५ वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिला सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा पारंपरिक वेशभूषा फेरी, पाश्चिमात्य…

Read More

नेतर्डे, गाळेल, डोंगरपाल, डिंगणे परिसरातील शेतकऱ्यांना गोवा वाहतूक यंत्रणेकडून त्रास

गोवा मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावा : गुरुदास गवंडे यांची मागणी ⚡बांदा ता.११-: बांद्याचा आठवडा बाजार सोमवारी असल्याने नेतर्डे, गाळेल, डोंगरपाल, डिंगणे आदी परिसरातील शेतकरीबांधव आपल्या शेतीत पिकलेले काजू, आंबे बाजाराला घेऊन येतात. परंतु आरटीओ कार्यालय हद्द असून गोवा राज्याची आरटीओ, ट्रॅफिक पोलीस यंत्रणा आदी गावातील नागरिकांना लायसन्स, हेल्मेट, पीयूसी, गाडीची कागदपत्रे अशा विविध कारणावरून शेतकऱ्यांना त्रास…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुधारा

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांची भेट : रुग्णांचे होणारे हाल थांबवा सावंतवाडी ता.११-: येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतले प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांची भेट व रुग्णांची होणारे हाल व उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांबाबत केली सविस्तर चर्चा केली. दरम्यान मागील काही दिवसापासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपचार घेतलेल्या रुग्णांनी केलेल्या तक्रारी यासंदर्भात…

Read More

सांगेलीतील नुकसानीची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली पाहणी…

सरसकट पंचनामे करा; अधिकाऱ्यांना केल्या सूचना सावंतवाडी : सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सांगेली सावरवाड व कलंबिस्त या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगेली गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करा कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची…

Read More
You cannot copy content of this page