Headlines

आडेली कामळेवीर शेतकऱ्यांमार्फतलघुपाटबंधारे विभागास निवेदन

वेंगुर्ला
आडेली कामळेवीर धरण – लघुपाटबंधारे प्रकल्‍पाचा बांध मजबुतीकरण करणे ( नवीन आरसीसी बंधारा बांधणे) बाबत व प्रकल्‍पामधील गाळ काढणे, अपूर्ण कामे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि सुरक्षाविषयक उपाययोजनां बाबत गुरुवारी
आडेली कामळेवीर येथील
पाणी वापर करणारे शेतकरी व ग्रामस्‍थ यांच्या वतीने
कार्यकारी अभियंता,
लघु पाटबंधारे विभाग (प्रकल्प), सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गोवेकर, मयुरेश मांजरेकर, युवा कार्यकर्ते प्रवीण गडेकर, ते सदस्य सुधीर धुरी,माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आडेली कामळेवीर
लघुपाटबंधारे प्रकल्‍प संदर्भात मोठया प्रमाणात समस्‍था निर्माण झालेल्‍या आहेत. सदर धरण क्षेत्रातील सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.धरणाची तांत्रिक सुधारणा: सध्याचा बंधारा मातीचा असल्याने, पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते. बंधा-याला ३ ते ४ ठीकाणी घळ पडलेले आहेत. बंधारा बसलेला आहे व वेगवेगळया ठिकाणी घळ निर्माण होत आहे. त्‍यामुळे बंधारा फुटुन जिवीतहानी होण्‍याची समस्‍था आहे. हे टाळण्यासाठी पाणीसाठा वाढण्यासाठी सदर बंधारा पूर्णपणे ‘रिनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट’ (RCC) मध्ये बांधण्यात यावा आणि त्याची उंची वाढवण्यात यावी. धरणातील साचलेला गाळ त्वरित काढण्यात यावा, ज्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढेल शेतक-याना मुबलक पाणी सिंचनासाठी उपलब्‍ध होईल.
बंधारा कमकुवत झाल्‍याने फुटण्‍याचा अवस्‍थेत असल्‍यामुळे नवीन पाट काढल्यामुळे पाणीसाठा ४० टक्‍के पेक्षा कमी राहणार आहे. त्‍यामुळे भविष्‍यात शेतक-याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेती बागायती यावर परिणाम होणार आहे. गेली ३ वर्षे कोणत्‍याही शेतक-याला मुबलक पाणी पुरवठा मिळालेला नाही, त्‍यामुळे सर्व भागातील शेतक-यांचे नुकसान होणार आहे. याबाबत नुकसान भरपाई साठी प्रस्तावित करण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे किंवा पिकांचे नुकसान होत आहे, त्यांना योग्य मोबदला त्वरित मिळावा आदी व अन्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page