भुमीपुजनाने कामांची सुरवात; ग्रामस्थांमधून समाधान..
⚡सावंतवाडी ता.११-: वेत्ये खांबलवाडी येथे सरपंच गुणाजी गावडे त्यांच्या हस्ते गणेश कोंड कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सरपंच श्री गावडे यांनी स्वखर्चातून हे काम हाती घेतले आहे त्यामुळे ग्रामस्थातूनही समाधान व्यक्त होत आहे.
वेत्ये खांबलवाडी याठिकाणी गणपती विसर्जनाची असलेली समस्या लक्षात घेत सरपंच श्री गावडे यांनी तेथील ग्रामस्थांना हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता दरम्यान तो पूर्ण करताना आज त्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले हे काम स्वखर्चातून ते पूर्ण करणार आहेत. या भूमिपूजन कार्यक्रमाला उपसरपंच शीतल खांबल, ग्रामस्थ बाबू मांजरेकर, शेखर खांबल, गिरीश खांबल, दादु मांजरेकर,राजु मांजरेकर इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
