⚡वेंगुर्ला ता.११-: मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठान २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार असून त्यासाठीची नविन पाषाणे भाविकांच्या अमाप उत्साहात रविवार दि. ९ एप्रिल रोजी मठ-कुडाळ तिठा ते मठ सातेरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूकीने वाजत गाजत आणण्यात आली.
या मिरवणूकीत परबवाडा महिला मंडळ व मठ हायस्कूलच्या मुलींचव्े लेझिम पथक, टाकयेवाडी महिलांचे झांजपथक, कणकेवाडी महिलांचे भजन मंडळ, पिद्रावण राजापूरचे ढोलपथक, नऊवारी साड्या नेसलेल्या महिला, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांच्यासह गावातील लहानथोर पुरुष मंडळीही सहभागी झाले होते. ही मिरवणूक मठ स्वयंभू मंदिरात आल्यानंतर देवतांच्या संचारासह सातेरी मंदिर येथे नेण्यात आली.
