गोवा मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावा : गुरुदास गवंडे यांची मागणी
⚡बांदा ता.११-: बांद्याचा आठवडा बाजार सोमवारी असल्याने नेतर्डे, गाळेल, डोंगरपाल, डिंगणे आदी परिसरातील शेतकरीबांधव आपल्या शेतीत पिकलेले काजू, आंबे बाजाराला घेऊन येतात. परंतु आरटीओ कार्यालय हद्द असून गोवा राज्याची आरटीओ, ट्रॅफिक पोलीस यंत्रणा आदी गावातील नागरिकांना लायसन्स, हेल्मेट, पीयूसी, गाडीची कागदपत्रे अशा विविध कारणावरून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. याकडे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना वाहतूक यंत्रणेकडून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी, मनसे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
श्री. गवंडे म्हणाले की, गोव्यातील अनेक गाड्या बांदा, सिंधुदुर्ग परिसरात येतात परंतु आमचे वाहतूक पोलीस एकही गाडीला किंवा आमचा आरटीओ तुमच्या कोणत्याही वाहनाला त्रास देत नाही. परंतु आम्ही सतत पाहत असतो की सीट बेल्ट, नसेल, युनिफॉर्म नसेल तर गोवा वाहतूक पोलीस ज्या पद्धतीने पेडणेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना त्रास देत आहेत ते त्वरित थांबवा अन्यथा आमचा आरटीओ आहे. ज्या पद्धतीने सिंधुदुर्गातील वाहनांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहात जशास तसे उत्तर देऊ. कारण सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध ज्या पद्धतीने आहेत ते तसेच राहू दे. गोरगरीब शेतकरी फक्त महामार्ग ओलांडतो तर त्या ठिकाणी गोवा वाहतूक पोलीस सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तेथून ये-जा करणाऱ्यांना त्रास देत आहेत याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे गोवा मुख्यमंत्र्यांना केली आहे.
फोटो——–
गुरुदास गवंडे
