बांदा शहरात युवकाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील गवळीटेम्ब येथील शिवराम दत्ताराम चव्हाण (वय २४) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

You cannot copy content of this page