मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.११-:
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था संचलित मालवणी बझार मालवणतर्फे आयोजित मिरची महोत्सवाचा आज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रताप सहदेव बागवे, संचालक मंडळ सदस्य, सभासद, कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या मिरची महोत्सवास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या मिरची महोत्सवात उच्च प्रतीची बॅडगी मिरची, काश्मिरी मिरची, गुंटुर मिरची अशा विविध प्रकारची मिरची व उच्च दर्जाचे गरम सामान विकीसाठी माफक दरात उपलब्ध करून ठेवण्यात1 आलेले आहे. या मिरची महोत्सवात उपलब्ध मिरचीच्या दर्जाबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. या मिरची महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी9 संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप सहदेव बागवे, संचालक प्रमोद लक्ष्मण मोहिते, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, मारूती रत्नोबा सोनवडेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद वसंत परब, सभासद, कर्मचारी, ग्राहक अनेक संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page