Headlines

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्राम पंचायत निगुडे यांनी केली मोठ्या उत्साहात साजरी

⚡बांदा ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत निगुडे येथे साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की नारीशक्तीचा सन्मान हाच देशा अभिमान हा शासनाने एक चांगला उपक्रम राबवून या…

Read More

कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने मोफत भात बियाणे वाटप

सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम ⚡कणकवली ता.३१-: ग्रामपंचायत कलमठच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. 15 वित्त आयोग मधुन शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात आले. खालची कुंभारवाडी,लांजे वाडी मधील 90 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री , ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर ,सदस्य स्वाती नारकर ,दिनेश गोठणकर ,नितीन पवार ,श्रेयस चिंदरकर , कर्मचारी रमेश…

Read More

कोंडये येथील पुलाची तात्काळ दुरुस्ती करा

माजी सरपंच अनिल मेस्त्री व ग्रामस्थांची मागणी ⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील कोंडये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावरील कोंडये नदीवरील पूल नादुरुस्त झाले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कोंडये गावचे माजी सरपंच अनिल रामकृष्ण मेस्त्री व ग्रामस्थांनी केली आहे.कोंडये झिरो पॉईंट ते तेलीवाडी ते करंजे या रस्त्याचे डांबरीकरण व…

Read More

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष पदी सुनिल राऊळ यांची निवड…

सचिव पदी बाबली गवंडे तर खजिनदारपदी सिद्धार्थ पराडकर बांदा ता.३१-: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची २०२३-२०२४ सालासाठी पुनर्रचना करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी सुनिल राऊळ, सचिवपदी बाबली गवंडे तर खजिनदारपदी सिद्धार्थ पराडकर यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महेश रेमुळकर आणि साक्षी कारीवडेकर यांची तर कार्याध्यक्षपदी दीपक तारी आणि सहसचिवपदी नारायण नाईक यांची तसेच सहखजिनदारपदी…

Read More

साटेली भेडशी पुलाचे काम संथगतीने

वाहनचालक, नागरिकांतून तीव्र नाराजी ⚡दोडामार्ग ता.३१-: पावसाळ्यात अतिशय महत्वाचा असा तिलारी दोडामार्ग महामार्गावरील साटेली भेडशी पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे वाहनचालक तसेच येथील नागरिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या पुलाची उंची कमी असल्याने यावरुन दरवर्षी पावसाळ्यात पाणी जाते.त्यामुळे पर्यायी पुलाचा वापर करावा लागत होता.ही गैरसोय लक्षात घेवुन याठीकाणी पुल मंजुर करण्यात…

Read More

शेर्लेतील रस्त्याचे काम पूर्ण क्षमतेने करा : बाळू गावडे

⚡बांदा ता.३१-: जिल्ह्यात मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरुवात झाल्या असून मान्सून अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेर्ले येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम पूर्ण क्षमतेने करावे अशी मागणी, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांची मागणी…

Read More

मोती तलावाच्या कठड्याच्या कामाची अनामिका चव्हाण यांच्याकडून पाहणी…

दर्जेदार काम करा ; ठेकेदाराला दिल्या सुचना… ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील मोती तलावाच्या राजवाड्यासमोरील संरक्षण कठड्याचे नव्याने सुरू केलेल्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम च्या अभियंता सौ अनामिका चव्हाण यांनी केली यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारास दर्जेदार काम करण्याबरोबरच युद्धपातळीवर काम पुर्ण करण्याची सूचना केली. सावंतवाडी राजवाड्या समोरील मोती तलावाच्या खचलेल्या संरक्षण कठड्यासाठी तब्बल ८५ लाख रुपये…

Read More

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.३१-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणा-या वर्धापन दिनानिमीत्त वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणाची जबाबदारी देण्याबाबत तसेच दहावी-बारावी परीक्षेत तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे आणि पक्षाच्यावतीने देण्यात येणारे उपक्रम तालुक्यात व शहरात राबविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ठरविण्यात आले.

Read More

सालईवाड्यात चोरट्याकडून पुन्हा चोरीच प्रयत्न..

पोलिसांसमोर आव्हान ; घरफोडीचे सत्र सुरुच ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील सालईवाडा परिसरात आणखीन एक बंद बंगला फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. मात्र यात कोणतीही चोरी झाली नसल्याचं सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी सांगितले. मात्र सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध घेत असल्याचा देखील मेंगडे यांनी सांगितल….

Read More

गोवळ ग्रामपंचायतच्या वतीने संतोष राणे यांचा सत्कार

⚡देवगड ता.३०-: ग्रामपंचायत कार्यालय गोवळ तालुका देवगड यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा गोवळ गावठण येथे कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक संतोष राणे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीवर संचालक म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा संचालक मंडळावर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष राणे हे विराजमान झाले आहेत. हे आपल्या गोवळ गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन…

Read More
You cannot copy content of this page