कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने मोफत भात बियाणे वाटप

सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम

⚡कणकवली ता.३१-: ग्रामपंचायत कलमठच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. 15 वित्त आयोग मधुन शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात आले. खालची कुंभारवाडी,लांजे वाडी मधील 90 शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री , ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर ,सदस्य स्वाती नारकर ,दिनेश गोठणकर ,नितीन पवार ,श्रेयस चिंदरकर , कर्मचारी रमेश चव्हाण, अण्णा सावंत उपस्थित होते. कलमठ गावातील शेतकऱ्यांना यावर्षी वाडीवार भात बियाणे उपलब्ध झाल्याने ग्रामपंचायतचे आभार मानून उपक्रमाचे कौतुक केले. पुढील 3 दिवसात गावातील सर्व वाडीमध्ये भात बियाणे वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page