वाहनचालक, नागरिकांतून तीव्र नाराजी
⚡दोडामार्ग ता.३१-: पावसाळ्यात अतिशय महत्वाचा असा तिलारी दोडामार्ग महामार्गावरील साटेली भेडशी पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे वाहनचालक तसेच येथील नागरिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पुलाची उंची कमी असल्याने यावरुन दरवर्षी पावसाळ्यात पाणी जाते.त्यामुळे पर्यायी पुलाचा वापर करावा लागत होता.ही गैरसोय लक्षात घेवुन याठीकाणी पुल मंजुर करण्यात आला.आणि या पुलाचे प्रत्यक्षात काम देखील सुरु झाले.परंतु काम सुरु झाले ते संथगतीने आता पाऊस काही दिवसावर येवुन ठेपला असताना अजुनही ह्या पुलाचे काम पुर्ण न झाल्याने या पावसाळ्यात हा पुल वाहतुकीस खुला होणार की नाही याबाबत माञ अजुनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तर सर्वांकडुन
नाराजी देखील व्यक्त होत आहे.
या मार्गावर वाहनांची वर्दळ देखील खुप आहे.परंतु या पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे तर या मार्गात काही झाडांचे अडथळे असुन काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने वाहचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सबंधित ठेकेदाराचे धिम्या गतीने सुरु असलेले काम सर्वांनाच त्रासदायक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकरी याकडे विशेष लक्ष्य वेधुन ठेकेदाराला हे काम लवकर पुर्ण करुन हा पुल वाहतुक खुला करण्यासाठी काही आदेश देतील का याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागुन राहीले.तर हा पुल पावसाळ्यापुर्वी वाहतुक खुला न झाल्यास याला जबाबदार सबंधित ठेकेदार की बांधकाम विभाग असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.
