⚡बांदा ता.३१-: जिल्ह्यात मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरुवात झाल्या असून मान्सून अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेर्ले येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम पूर्ण क्षमतेने करावे अशी मागणी, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांची मागणी असलेले शेर्लेतील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम अधिक जलद गतीने करावे. काम सुरू असताना पाऊस आल्यास साहित्यसह निधीची नासाडी होईल. परिणामी काम अर्धवट स्थितीत राहील अन याचा त्रास मडुरा पंचक्रोशीसह ये-जा करणाऱ्या प्रवासी, वाहनचालक यांना सहन करावा लागणार. जास्ती ते काम झाले असून कमी काम शिल्लक राहिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण क्षमतेने पावसाळ्यापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी उपसरपंच बाळू गावडे यांनी केली.
