मोती तलावाच्या कठड्याच्या कामाची अनामिका चव्हाण यांच्याकडून पाहणी…

दर्जेदार काम करा ; ठेकेदाराला दिल्या सुचना…

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील मोती तलावाच्या राजवाड्यासमोरील संरक्षण कठड्याचे नव्याने सुरू केलेल्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम च्या अभियंता सौ अनामिका चव्हाण यांनी केली यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारास दर्जेदार काम करण्याबरोबरच युद्धपातळीवर काम पुर्ण करण्याची सूचना केली.


सावंतवाडी राजवाड्या समोरील मोती तलावाच्या खचलेल्या संरक्षण कठड्यासाठी तब्बल ८५ लाख रुपये मंजूर झाले असून गेल्या दोन दिवसापासून हे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाच्या ठिकाणी आज बांधकामच्या अभियंत्या सौ.चव्हाण यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली व संबधित ठेकेदारास आवश्यक सूचनाही दिल्या. खचलेल्या अवस्थेतील हा कठडा कधीही कोसळण्याच्या स्थितीती होता. कितने याबाबत वारंवार लक्ष वेधूनही पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती. मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मोती तलावाच्या डागडुजी साठी निधी उपलब्ध झाला तर दुसरीकडे राज घराण्याकडूनही यासाठी हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्षात हे काम हाती घेण्यात आले.

पावसाळा तोंडावर असल्याने गेले दोन दिवस युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे लवकर संरक्षण भिंत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र सदरचे काम करताना कामाचा दर्जा राखूनच काम झाले पाहिजे अशा स्पष्ट सूचना आहे बांधकामच्या असावं चव्हाण यांनी ठेकेदाराला दिल्या. तर उपजिल्हा रुग्णालयासमोरील संरक्षण भिंतीचे ही काम पूर्णत्वास आले आहे शेवटचे किरकोळ काम उरले असून तेही मार्गी लागेल. तर वापस हॉटेल समोरील संरक्षण भिंतीचे कित्येक वर्ष उरलेले काम पुढच्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असल्याचे सौ चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page