सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष पदी सुनिल राऊळ यांची निवड…

सचिव पदी बाबली गवंडे तर खजिनदारपदी सिद्धार्थ पराडकर

बांदा ता.३१-:

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची २०२३-२०२४ सालासाठी पुनर्रचना करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी सुनिल राऊळ, सचिवपदी बाबली गवंडे तर खजिनदारपदी सिद्धार्थ पराडकर यांची फेरनिवड करण्यात आली.


उपाध्यक्षपदी महेश रेमुळकर आणि साक्षी कारीवडेकर यांची तर कार्याध्यक्षपदी दीपक तारी आणि सहसचिवपदी नारायण नाईक यांची तसेच सहखजिनदारपदी मधुकर उर्फ योगेश सावंत एकमताने निवड करण्यात आली.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ही रक्तदान, अवयवदान, देहदान आदीसाठी सदैव तत्पर असणारी नोंदणीकृत संस्था आहे. वेळीच रक्तपुरवठा करुन एखाद्याचा जीव वाचविणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य असुन सामाजिक जबाबदारी म्हणून शासनाच्या धोरणाला अनूसरुन रक्तदान चळवळीच्या विविध कार्यात कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे. संस्थेने सातत्याने अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे. रक्ताबरोबरच प्लेटलेटस, प्लाझ्मा दानही संस्थेच्या सदस्यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या संस्थेत समावेश आहे. तसेच संस्था जिल्ह्यातील एकूण ७४३ गावामध्ये रक्तदान चळवळीबाबत जनजागृती करत आहे.
अशा प्रकारे कार्यरत असणार्‍या या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची सभा संपन्न झाली, त्यावेळी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये संदीप चांदेकर (सावंतवाडी), रविंद्र तावडे (कलंबिस्त), सागर नाणोसकर (नाणोस), मिनल सावंत (सावंतवाडी), मायकल डिसोजा (आंबोली), निलेश मोरजकर (बांदा), बोमा उर्फ पप्पी कवठणकर (सातार्डा-कवठणी), नेल्सन मिनेझीस (सावंतवाडी), शिवम बोंद्रे (आरोस) या सर्वांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
तालुका सल्लागारपदी सुधीर पराडकर आणि आनंद वेंगुर्लेकर यांची फेरनिवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्वांचेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे जिल्हा सल्लागार दयानंद गवस, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांच्यासहीत जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी तसेच समाजातील मान्यवर व्यक्तींनी व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page