⚡देवगड ता.३०-: ग्रामपंचायत कार्यालय गोवळ तालुका देवगड यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळा गोवळ गावठण येथे कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक संतोष राणे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीवर संचालक म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा संचालक मंडळावर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष राणे हे विराजमान झाले आहेत.
हे आपल्या गोवळ गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन गोवळ सरपंच सौ दक्षता दिनेश मेस्त्री यांनी केले यावेळी माजी सरपंच राजेश जठार, पोलीस पाटील मंगेश आलव, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम घाडी, दत्तगुरु सोमले स्मिता बापर्डेकर, सुरेश घाडी तानाजी गुरव, श्री सोमले, भुसेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय घाडी, दिलीप हादगे, कृषी सहाय्यक प्रेरणा साटम ग्रामसेविका श्रीमती फड मॅडम ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी माजी उपसरपंच दिनेश मेस्त्री यांनी सर्वांचे आभार मानून व श्री राणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
