Headlines

कुडाळ येथे १५ ऑगस्टला चेम्बर ऑफ कॉमर्सच्या नव्या कार्यालयाचे उ‌द्घाटन…

कोकणच्या औ‌द्योगिक विकासाला नवी दिशा:नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि भव्य उ‌द्योजक परिसंवाद.. ⚡कुडाळ ता.०६-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) या महाराष्ट्रातील उ‌द्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आणि राज्य शासनमान्य सर्वोच्च उ‌द्योग संघटनेच्या वतीने दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे दोन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती…

Read Full News

आयुष ओपीडी सुरू करा; अन्यथा स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन…

नगरसेवक देव्या सूर्याजी:५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा.. सावंतवाडी : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या ओपीडी संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे‌. तसेच ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात कसूर केलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यासह पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे तात्काळ…

Read Full News

वेंगुर्ला भाजपातर्फे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा सत्कार

वेंगुर्लाकोकण विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अलिबाग रायगड येथील महसूल दिनानिमित्त च्या कार्यक्रमाला कोकण विभागात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना पुरस्कार…

Read Full News

वेत्येतील युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

सावंतवाडी : वेत्ये येथील राजन रामा गावडे (वय ४५) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज पहाटे घरात औषधाची दुर्गंधी येत असल्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा…

Read Full News

रॅगिंग केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; वाहन चालविताना वयाचे भान ठेवा…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.. ⚡ओरोस, ता. ६ -: रॅगिंग हा केवळ विद्यार्थ्यांची चेष्टा-मस्करीचा प्रकार नसून त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रॅगिंगमुळे विद्यार्थी नैराश्यात जाऊ शकतात, शिक्षण सोडण्याचा विचार करू शकतात, तर काही वेळा त्याचे गंभीर परिणामही होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे. तसेच…

Read Full News

१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘उद्योजक विचार मंच’ स्थापन करण्याचा प्रस्ताव…

ओरोस ता ६प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘उद्योजक विचार मंच केंद्र’ स्थापन करून गावातील उद्योगक्षमतेला एकत्रित दिशा देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत उद्योजक विचार मंचाचा विषय अजेंड्यावर ठेवून त्यावर चर्चा केली जाणार आहे….

Read Full News

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळाध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती…

जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र प्रदान;कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी, ता. ६-: भारतीय जनता युवा मोर्चा, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून माडखोल येथील श्री. विनेश सत्यविजय तावडे यांची आंबोली मंडळाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र देत ही नियुक्ती जाहीर केली. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने…

Read Full News

घरफोडी प्रकरणाचा एलसीबीकडून छडा; सराईत चोर विरारमधून जेरबंद…

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले पथक:चोरीतील दोन्ही मोबाईल व स्मार्ट वॉच हस्तगत.. ⚡कणकवली ता.०६-: ओटव येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सराईत चोरट्याला विरार येथून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच हस्तगत…

Read Full News

फळपिक विमा भरपाईचा मार्ग मोकळा होणार…

वंचित शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा पुढाकार:१० ऑगस्टला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक.. कणकवली : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे भरपाईपासून वंचित राहिलेल्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय…

Read Full News

डोंगर सपाटीकरणामुळे कारिवडे-भेंवकवाडीतील घरांना धोका…

संबंधितांवर त्वरित कारवाई करा: माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी: तहसीलदारांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी, ता. ६-: कारिवडे-भेंवकवाडी परिसरातील डोंगर जमिनीचे सपाटीकरण करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आल्याने परिसरातील घरे, शेती, विहिरी व कंपाऊंड भिंतींचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदार यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.याबाबत माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page