सावंतवाडी : वेत्ये येथील राजन रामा गावडे (वय ४५) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज पहाटे घरात औषधाची दुर्गंधी येत असल्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. आत्महत्या नेमकी का केली ? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
वेत्येतील युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…
