Headlines

वेंगुर्ला भाजपातर्फे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा सत्कार

वेंगुर्ला
कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अलिबाग रायगड येथील महसूल दिनानिमित्त च्या कार्यक्रमाला कोकण विभागात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.
हा त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,
जि. प. शिक्षण व सभापती प्रितेश राऊळ,
वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे,
वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडिस, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, म्हापण पं. स. सदस्य विष्णू उर्फ आपी फनसेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुऱी, वायंगणी पं. स. सदस्या शीतल बांदवलकर राऊत, नगससेविका गौरी मराठे व गौरी माईणकर, अणसूर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, आसोली सरपंच बाळा जाधव, पाल सरपंच कावेरी गावडे,खानोली सरपंच सुभाष खानोलकर,सायमन आल्मेडा, पाल शक्तीकेंद्रप्रमुख कमलेश गावडे,तुषार साळगावकर, पपन बांदवलकर, संतोष धानजी,अनन्या धावडे आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page