Headlines

भाजप युवा मोर्चाच्या आंबोली मंडळाध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती…

जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र प्रदान;कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव..

⚡सावंतवाडी, ता. ६-: भारतीय जनता युवा मोर्चा, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून माडखोल येथील श्री. विनेश सत्यविजय तावडे यांची आंबोली मंडळाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र देत ही नियुक्ती जाहीर केली. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून तावडे यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
युवा मोर्चाच्या संघटन विस्तारास चालना देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात आंबोली मंडळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तावडे कार्यरत राहतील, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page