Headlines

मायकल डिसोजा यांनी नगराध्यक्षांवर केलेले आरोप गंभीर…

डॉ जयेंद्र परुळेकर:आजगावात ग्रामसभेच्या ठराव धुडकावून ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्यांना अटक का झाली नाही..? सावंतवाडी : जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांनी नगराध्यक्षांवर केलेले आरोप हे गंभीर असून’ नगराध्यक्षांवर राजघराण्यातील लखम सावंत यांना टक्केवारीचे आरोप होत आहेत ही गोष्ट लाजिरवाणी आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा या संस्थानला असून इतर ठिकाणी समस्या असताना सावंतवाडीत सुराज्य आणणारे ते राजे होते‌….

Read More

मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका, हर्ष आणि बाळकृष्णची राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१६: सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळातर्फे अठराव्या कै.बाबूकाका शिरगावकर फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहित सात राज्यातील दोनशे साठ खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका नार्वेकर, आकाश वाटवे, प्रज्वल नार्वेकर, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ आणि बाळकृष्ण पेडणेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन…

Read More

चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणूकीत एकता पॅनेलचा विजय…

सिंधुदुर्गातील निवडणुकीत ‘एकता’ चे सर्व उमेदवार विजयी.. ⚡कुडाळ ता.१६-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणुकीत एकता पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे. निवडणूक प्रक्रियेत राज्यभरातून 168 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी तब्बल 148 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम यंदाच्या निवडणुकीत नोंदवला गेला. चेंबरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच सहा उपाध्यक्ष…

Read More

ग्रामस्थांचा विरोध डावलून ड्रोन सर्वे सुरू…

तालुक्यातील घटना: ग्रामस्थ आक्रमक, संजू परब, वैभव नाईक ,रुपेश राऊळ ,यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत.. ⚡सावंतवाडी, ता.१६-:तालुक्यातील एका गावात खाजगी कंपनीकडून मायनिंगसाठी सुरू असलेला ड्रोन सर्वे ग्रामस्थांच्या विरोधानंतरही करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या सर्वेला विरोध दर्शवत ड्रोन खाली पाडला तसेच संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी…

Read More

वैभववाडीत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे उत्साहात स्वागत…

⚡वैभववाडी ता.१५-: शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी थोरात साहेब यांची विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला भेट देऊन नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्सवात करण्यात आली या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला गटशिक्षण अधिकारी थोरात साहेब यांनी भेट देत नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर…

Read More

वेत्ये गावच्या सुयोग गावकरचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण; जितेंद्र गावकर यांच्याकडून गौरव…

⚡​सावंतवाडी ता.१५-:वेत्ये सारख्या एका छोट्या गावातील युवक डॉक्टर होणे हे संपूर्ण गावासाठी भूषणावह आहे. सुयोगने घेतलेले अथक परिश्रम, मेहनत आणि जिद्दीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे, असे गौरवद्गार पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी काढले.​सावंतवाडीचे माजी सभापती रमेश गावकर यांचे सुपुत्र सुयोग गावकर हे एमबीबीएस (MBBS) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला….

Read More

विद्यार्थ्यांनी आई-वडील यांचे आदर्श समोर ठेऊन शिक्षण घ्यावे…

श्री. प्रितेश राऊळ ; वेंगुर्ला तालुका – शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात तसेच शहरात जि. प. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह नूतन लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी सर्व प्रमुख शाळात उपस्थिती दर्शविल्यानेवेंगुर्ला तालुका शहरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळीविद्यार्थ्यांनी आई-वडील…

Read More

मालवण तालुक्यातील मंडळे आंबा पीकविमा नुकसान भरपाईतून वगळली…

आंबा- काजू उत्पादक आक्रमक.. ⚡मालवण ता.१२-:यावर्षी हवामानातील तीव्र बदलांमुळे मालवण तालुक्यातील आंबा आणि काजू उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्यांनी तालुक्यातील अनेक प्रमुख मंडळांना नुकसान भरपाईतून वगळून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित यांच्या वतीने तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देण्यात…

Read More

भंडारी हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात…

⚡मालवण ता.१५-:आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी मोफत पाठ्यपुस्तक तसेच विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज…

Read More

आंबोलीतील धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश:घाटातील दरड, तुटलेले संरक्षक कठडे व धोकादायक झाडांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी.. ⚡आंबोली, ता. १५-:आंबोली परिसरातील धोकादायक वृक्षांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेता आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली गाव हद्दीतील धोकादायक…

Read More
You cannot copy content of this page