Headlines

मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा असताना अशावेळी जिल्ह्यात कार्यक्रम करणे चुकीचं…

मंत्री दीपक केसरकर: उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; शरद पवार यांना भेटायला जाण्याची ही माझी पूर्वनियोजित भेट… ⚡सावंतवाडी ता.२९-: जरांगे पाटील यांचा उपोषण स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या त्यांची भेट घेतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांचा शी संवाद साधून उपोषण उठवतील‌. त्यामुळे आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित असणे महत्त्वाचा आहे तसेच मराठा आरक्षणासाठी उभा केलेला…

Read More

जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत नारायण धुरी प्रथम…

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे आयोजित कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत नारायण धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांक भूषण दत्तदास व तृतीय क्रमांक आदिती आचरेकर यांनी मिळविला. नगर वाचन मंदिरच्या सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर परिक्षक, ज्येष्ठ स्पर्धक बबन हिवाळेकर, आदिती आचरेकर यांच्या हस्ते…

Read More

तळेरे – गगनबावडा रस्ता दुर्दशेबाबत ठाकरे शिवसेनेतर्फे उदया पदयात्रा…

करुळ ते नाधवडे पदयात्रेत रस्ता दुर्दशेचीही पाहणी करणार:संदेश पारकर. ⚡कणकवली ता.२९-:तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून त्याचा परिणाम ऊस वाहतूक, सिलिका, अन्य मालवाहतूक व सर्वच वाहनधारकांना होत आहे. रस्ता दुपदरीकरणाबाबत २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी देखील या रस्त्याचे अद्यापही काम सुरु न झाल्याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे करूळ…

Read More

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी…

प्रवीण कोल्हे:विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा.. ⚡मालवण ता.२९-:सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात सतर्क असले पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षेबरोबरच सुरक्षादूत म्हणून समाजामध्ये भूमिका पार पाडावी, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, असे प्रतिपादन मालवणचे पोलीस पाटील प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील चौके येथील भ. ता. चव्हाण…

Read More

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चौके हायस्कुलचे यश…

⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय चौकेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत सांगली येथे विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. यामध्ये अनुष्का खंडू शिंदे हिचा २०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक तसेच समीक्षा सुरेश कामते हिचा १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक आला. या दोघींनाही क्रीडा शिक्षक वाघमारे यांचे…

Read More

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचीच सत्ता येईल…

संदेश पारकर:आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने या भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावलेत.. ⚡मालवण ता.२९-:भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याने केंद्र आणि राज्यातील सरकार विरोधात लोकांमध्ये संताप आहे या मुळे शिवसेना महाविकास आघाडी हा सक्षम पर्याय वाटत असल्याने आचरा ग्रामपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा फडकेल आणि सरपंचासह सर्वच सदस्य बहुमताने निवडून येतील…

Read More

कोमसाप मालवण शाखेच्या ‘ये ग, ये ग सरी’ काव्यसंग्रहाचे ७ रोजी प्रकाशन

⚡मालवण ता.२९-: कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेतील २५ कवींच्या कवितांचा समावेश असलेला ये ग,ये ग सरी या कवितासंग्रहाचे प्रकाशन कविकुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी दि. ७ नोव्हेंबर रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दुपारी ३:३० वाजता होणार आहे. ये ग, ये ग सरी या कवितासंग्रहातील कविता कोमसाप मालवणच्या २२ उदयोन्मुख कवींनी लिहिल्या असून…

Read More

अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे…

विष्णू कोरगावकर:मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे… ⚡मालवण ता.२९-: जीवनात खेळ महत्वाचे असून मुले खेळण्यासाठी इच्छुक असतात मात्र त्यांना वेळ मिळत नाही. अभ्यासा बरोबरच खेळही महत्वाचे असल्याने अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. गुणवत्ता असणाऱ्या मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन मालवण येथील कोरगावकर टेबल…

Read More

इंडिया आघाडीच सरकार येणार असल्यानेच मंत्री केसरकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले…

प्रविण भोसलेंचा टोला: तेलींना केसरकर कमळ चिन्ह मिळू देणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.२९-: इंडिया आघाडीच सरकार येणार असे भासू लागल्याने केसरकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे लगावला.दरम्यान राजन तेली हे कावरे बावरे झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना मतदान होऊ शकत…

Read More

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला मराठे कुटुंबीयांकडून इन्व्हर्टर भेट

सावंतवाडी – प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाडला कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबियाकडून डॉ.राखी राव यांच्याकडे इन्व्हर्टर भेट सुपूर्द करण्यात आला आहे. कै.रमाकांत सदाशिव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मळेवाड येथील कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबीयांकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर भेट देण्यात आला आहे.या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राखी राव यांच्याकडे…

Read More
You cannot copy content of this page