अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे…

विष्णू कोरगावकर:मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे…

⚡मालवण ता.२९-: जीवनात खेळ महत्वाचे असून मुले खेळण्यासाठी इच्छुक असतात मात्र त्यांना वेळ मिळत नाही. अभ्यासा बरोबरच खेळही महत्वाचे असल्याने अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. गुणवत्ता असणाऱ्या मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकॅडमिचे संचालक विष्णू कोरगावकर यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मालवणची विध्यार्थिनी कुमारी दुर्वा मनोज चिपकर हिची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल कु. दुर्वा हीला सदिच्छादर्शक कार्यक्रम पार पडला यावेळी मुख्याध्यापक एच बी तिवले, क्रिकेट संघाचे प्रशिक्षक संदिप पेडणेकर, ज्ञानेश केळूसकर , क्रीडा शिक्षक आर बी देसाई, आर डी बनसोडे, आदी व इतर उपस्थित होते
प्रारंभी क्रीडा शिक्षक आर. बी. देसाई यांनी स्वागत केले

यावेळी कु. दुर्वा चिपकर आणि तीचे प्रशिक्षक विष्णू कोरगावकर, तसेच विभागस्तरावर मजल मारणाऱ्या १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक संदिप पेडणेकर, ज्ञानेश केळूसकर या मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री. कोरगावकर यांनी शालेय जीवनात असणारे खेळाचे महत्व स्पष्ट केले तर आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page