इंडिया आघाडीच सरकार येणार असल्यानेच मंत्री केसरकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले…

प्रविण भोसलेंचा टोला: तेलींना केसरकर कमळ चिन्ह मिळू देणार नाही..

⚡सावंतवाडी ता.२९-: इंडिया आघाडीच सरकार येणार असे भासू लागल्याने केसरकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे लगावला.दरम्यान राजन तेली हे कावरे बावरे झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना मतदान होऊ शकत नाही तसेच केसरकर हे भाजप सोबत राहिले तर केसरकर कमळ चिन्ह हे तेली यांना मिळू देणार नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लागवला.श्री.प्रविण भोसले आज आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.

You cannot copy content of this page