⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय चौकेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत सांगली येथे विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
यामध्ये अनुष्का खंडू शिंदे हिचा २०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक तसेच समीक्षा सुरेश कामते हिचा १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक आला. या दोघींनाही क्रीडा शिक्षक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
