श्री. शंकर घारे ; केळूस येथे तालुकास्तरीय कृषीदिन व कृषीमेळावा संपन्न
वेंगुर्ला
भारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडविल्याने आज कृषी क्षेत्रात मोठे बदल दिसून येत आहेत. आज शेतीबरोबरच पशुधन टिकविण्यासाठी सर्वंकश प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी केळुस येथे बोलताना व्यक्त केले. वेंगुर्ला पंचायत समिती वेंगुर्ला कृषि विभाग,महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आज बुधवारी स. का. पाटील विद्यामंदीर, केळूस येथील गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात तालुकास्तरीय कृषिदिन व शेतकरी मेळावा
वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई, म्हापण जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे, तुळस जि. प. सदस्य सुजाता पडवळ, आडेली जि. प. सदस्य विजय नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, पं.स. कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, म्हापण पंचायत समिती सदस्य विष्णु उर्फ आप्पी फणसेकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, केळूस सरपंच योगेश शेट्ये, उपसरपंच संजीव प्रभू, केळूस ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रणजीत देव्हारे, धनंजय गोळम, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, पेंडुर सरपंच संतोष गावडे, सत्यविजय गावडे, बंड्या पाटील, अवि दुतोंडकर, उपसरपंच रुपेश मुंडये, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर, म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, महेश नाईक, सुप्रिया कोरगावकर, सखाराम सावंत, सायली सातोसे, विकास केळूसकर
आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षण सभापती प्रितेश राऊळ म्हणाले, केळुस गावाने कृषी दिनाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबविला आहे. वसंतराव नाईक यांनी घडविलेल्या शेतीतील क्रांतीमुळे आज चांगले फलित मिळत आहे.
यावेळी बोलताना उपसभापती सचिन देसाई म्हणाले, आज युवा वर्ग उदरनिर्वाहासाठी बाहेर जातोय, त्यामुळे शेतजमिनी ओस पडत चालल्या आहेत. तरीही शेतकरी राजा अन्नधान्य पिकवतोय, त्यामुळे आजही शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पूर्वी दिसणाऱ्या चार -पाच बैल जोड्या आज कमी होऊन यांत्रिकीकरण झाले आहे. त्यात वाढ होऊन शासनाच्या योजनांचा परिपूर्ण लाभही शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषी विभाग अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भेटी देऊन शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. दोनच दिवसापूर्वी आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत नुकसान भरपाईच्या विषय लावून धरल्यामुळे 209 कोटी रुपये मंजूर झाले, तसेच कर्जमाफीची घोषणाही झाली, ही मोठी आश्वासक बाब आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तसेच मच्छीमारांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी केळुस व नजीकच्या गावांना विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सचिन देसाई यांनी दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. आबा वराडकर व अन्य मान्यवर व्यक्तीमुळे केळुस गावाने राज्यास्तरावर चांगली कामगिरी केली आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. वृक्षदिंडी शालेय विद्यार्थ्यांद्वारे ईश्वस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात मंगेश चव्हाण, धनंजय गोळम, डॉ. रणजित देव्हारे, जि. प.सदस्य व पं. स. सदस्य नितीन मांजरेकर यांनी कृषिविषयक उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी प्रितेश राऊळ
यांचा सभापती शंकर घारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सभापती व अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात तारादेवी महिला गटाने शेतकरी नृत्याचे “उत्कृष्ट सादरीकरण” केले. यावेळी स.का. पाटील विद्यामंदिर केळुस, नवभारत विद्यालय केळुस व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कालवी आदी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी, विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्री यामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा वेंगुर्ला तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष संजय गावडे यांनीही मार्गदर्शन करताना शासनाने आजही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अग्रक्रमाने लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बिडीओ वासुदेव नाईक, सूत्रसंचालन व आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले. या
कृषी दिन व शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेतकरि, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
